आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडितेच्या नातेवाईंकाना दिली धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवडच्या थेरगावमध्ये घरात एकटी पाहून 16 वर्षीय मुलीवर एका तरुणा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी युवक घरी कोणी नसल्याचा गैरफायदा उचलत दगड कापण्याची मशीन मागण्याच्या बहाण्याने घुसला वर पीडित मुलीवर बलात्कार केला. हा प्रकार रविवारी दुपारी घडला. पोलिसांनी रवी ग्यासीराम जाटव (26, थेरगाव, मूळगाव- मोरेनागाव, मध्यप्रदेश) याला अटक केली आहे.  

 

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जाटव हा रविवारी दुपारी पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत दगड कापण्याची मशीन पाहिजे या बहाण्याने घरात घुसला. त्यानंतर त्याने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर तीन वेळा पाशवी बलात्कार केला. पीडित मुलीच्या नातेवाईकांना ही बाब समजताच त्यांनी आरोपीचे घर गाठून जाब विचारला तर उलट त्याने त्यांनाच पोलिसात गेला तर ठार मारण्याची धमकी दिली. वाकड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...