आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार करुन बनविला व्हिडिओ, VIRAL करण्याची दिली धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-  शिरूर परिसरात शिक्षकाने विद्यार्थिनीवर दोन वेळा अत्याचार करत चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मुलीच्या नातेवाईकांना मिळताच शिक्षकाला चोप देत शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना काल गुरुवारी घडली आहे. सुनील आबासाहेब जानकर अस नराधम शिक्षकाचे       नाव आहे.

 

मिळालेल्या महितीनुसार, सुनील जानकर हा एका खासगी शाळेत शिक्षक पदावर कार्यरतआहे. त्याने पीडित मुलीला नोट्स देण्याच्या बहाण्याने मित्राच्या घरी बोलावले व तेथे तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला. शिवाय तिचा अश्लील विडिओ बनविला. या बद्दलकुणाला सांगितले तर हा विडिओ सोशल मीडियात व्हायरल करून बदनामी करण्याची पीडितेला धमकी दिली. पीडिता घाबरलेल्या अवस्थेत होती. 


मात्र शिक्षकाने धमकी देतर  तिच्यावर शाळेतील लॅबमध्ये देखील पुन्हा अत्याचार केला. अखेर हिंमत करून पीडितने घटनेची माहिती आईला सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये नराधम शिक्षक सुनील जानकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या दरम्यान पीडितेच्या नातेवाईकांनी शिक्षकाला शाळेतून चोप देत शिक्रापूर पोलिस ठाण्यात नेले. सदर शिक्षकावर बलात्कार प्रकरणी शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...