आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्‍नाला पूर्वसंध्‍येला नवरी मुलीची आत्‍महत्‍या, पुण्यात हृदयाला चटका लावणारी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- लग्‍नाला केवळ एक दिवस शिल्‍लक असतानाच नवरी मुलीने आत्‍महत्‍या केल्‍याची हृदयाला चटका लावणारी घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. सीमा दिलीप सकाटे असे आत्‍महत्‍या केलेल्‍या 22 वर्षीय युवतीचे नाव आहे.  तिने काल (मंगळवार) रात्री साडेनऊच्‍या सुमारास घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. लग्‍नाला एक दिवस बाकी असतानाच मुलीने आत्‍महत्‍या का केली, हे अद्याप समजू शकलेले नाही. पिंपरी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, सीमा उद्या (गुरुवार, 14 ऑगस्ट) रोजी विवाह बंधनात अडकणार होती. यासाठी घरात सर्वांचीच धावपळ सुरु होती. मंगळवारी संध्‍याकाळी घरातील सगळी मंडळी लग्नाचा बस्ता घेण्यासाठी खरेदीला गेले होते. हातावर मेहंदी काढल्यामुळे सीमा घरीच होती. घरी तिच्या सोबतीला तिची छोटी बहीणही होती. मात्र बहीण घरा बाहेर जाताच रात्री साडेनऊ वाजता सीमाने घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आपले जिवन संपवले. बहीण घरी परतली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. एका क्षणात आनंद साजरा करणा-या लग्‍नघरावर शोककळा पसरली आहे. ज्या घरातून तिची वरात निघणार होती त्याच घरातून तिची अंतयात्रा निघाल्‍याने सर्वांच्‍याच ह्रद्याला चटका बसला आहे. 

बातम्या आणखी आहेत...