आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : पिंपरी- चिंचवड शहरासह एक्सप्रेस वे ने पांघरली दाट धुक्याची चादर...!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- मागील आठवड्यात ओखी चक्रीवादळाचा दाब पट्टा तयार झाल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पावसाळा असल्याचा भास होत होता. अगदी दोन दिवसापूर्वीही पावसाने हजेरी दिली होती मात्र, त्यानंतर आज (शनिवारी) पहाटे पिंपरी- चिंचवड शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला. सोबतच सर्वत्र दाट धुक्याची झालर पसरलेली दिसली. पिंपरी, चिंचवड, रावेत, आकुर्डी, देहूरोड, निगडी, तळेगाव, वडगाव, एक्स्प्रेस वे आदींसह मावळ भागात दाट धुक्याची चादर पसरलेली दिसली. सकाळी सात वाजेपर्यंत या धुक्याचा प्रभाव होता.

 

वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे शहर सर्वत्र थंडीत बुडाल्याचे दिसून आले. धुके दाट असल्याने दिवस उजाडला तरी देखील नागरिक वाहनांच्या लाईट सुरु ठेऊन आपली वाहने चालवीत होते. ओखी चक्रीवादळ दूर जाताच शुक्रवारी दिवसा स्वच्छ सुर्यप्रकाश पडला आणि तर शनिवारी पहाटे अचानक थंडी वाढली. थंडीच्या कडाक्यानंतर फार उशिराने सूर्यदर्शन झाल्याने पुणेकरांनी या सूर्यदर्शनचा सुखद क्षण अनुभवला. अचानक पडलेल्या या धुक्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्यांना सुखद अनुभव घेता आला.

 

दिवसा तापणारे ऊन आणि सूर्य माळवताच थंडी असे वातावरण शहरवासीयांना सध्या अनुभवायला मिळत आहे. शुक्रवारी (दि. 8) शहराचे तापमान १८.२ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले. थंडी सकाळी उशिरापर्यंत कायम असल्याने नागरिक उबदार कपडे घालूनच कामोकामी बाहेर पडताना दिसत आहेत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, पिंपरी-चिंचवड परिसरात आज पहाटे पसरलेली धुक्याची दुलईचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...