आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी, पुणे, नाशिकमध्ये गारांचा पाऊस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/नाशिक- राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून ब-याच ठिकाणी वादळी वा-यासह गारांचा पाऊस पडला आहे. यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी पुण्यातील जुन्नर परिसरात आणि नाशिकमधील मनमाड,चांदवडमध्ये गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. औरंगाबादमध्ये वादळ आल्याने लोकांची तारांबळ उडाली. तसेच शहरातील बेगमपुरा भागात जोरदार पाऊस झाला. 

 

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून दोन दिवसांपासून हवेमध्ये गारवा वाढला आहे. त्यामुळे काही दिवस कडक उन्हापासून दिलासा मिळाला आहे. पण दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान होत आहे. शुक्रवारी दुपारी लातूरमधील निलंगा आणि उदगीरमध्ये गारांचा पाऊस पडला. दरम्यान मागील चार दिवसांपूर्वी हवामान खात्याने राज्यात गुरुवारी अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. 

बातम्या आणखी आहेत...