आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठय़ांचा इतिहास देशात सर्वत्र शिकवला जावा; भिडे गुरुजी करणार पंतप्रधान मोदींकडे मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारतातील सर्व राज्यांत मराठय़ांचा इतिहास शिकवला जावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे म्हटले आहे. 

 

 

आगामी प्रतापगड ते रायरेश्वर गडकोट मोहिमेबद्दल मार्गदर्शन करताना भिडे गुरुजी बोलत होते. भिडे गुरुजी म्हणाले, की छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज हे भारतमातेचे प्राण आहेत. त्यांच्या इतिहासातून राष्ट्रभक्तीचेच धडे मिळतात. छत्रपती शिवरायांनी कसे जगावे याचा तर छत्रपती संभाजीराजांनी कसे मरावे याचा मंत्र दिला. आज राष्ट्रउभारणी आणि त्याच्या रक्षणासाठी देशात सर्वत्र हा इतिहास शिकवण्याची गरज आहे. 

 

 

आमच्या इतिहासात दडलेले राष्ट्रभक्तीचे धडे आजच्या तरुणाईला मिळाले पाहिजेत असे सांगून ते म्हणाले, की या इतिहासातून सक्षम भावी पिढी तयार होईल. ही अशी पिढी तयार व्हावी यासाठीच गडकोट मोहिमांचे आयोजन गरजेचे आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...