आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहिती आहे का? पुणेरी पगडीचे वैशिष्य आणि इतिहास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणेरी पगडी.... - Divya Marathi
पुणेरी पगडी....

महाराष्ट्रात पूर्वी फेटा, टोपी, मुंडासे किंवा इतर वगैरे डोक्याला बांधल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही अशी पद्धत होती. त्यातल्या त्यात मग समाजातील स्थानानूरुप डोक्यावरचे शिरस्त्राण बदलले जायचे. याचाच एक भाग म्हणजे पुणेरी पगडी. पणेरी पगडीला पेशवाई पार्श्वभूमी आहे. आज बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांना पुणेरी पगडीविषयी माहिती देत आहे...


पुणेरी पगडी हा एक महाराष्ट्रातील पगडीचा प्रकार आहे. या पगडीचा उगम पेशव्यांच्या काळात झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, इत्यादी विद्वान व्यक्ती ही पगडी घालत होते. आजही पुण्यात पुणेरी पगडी हे मानाचे प्रतीक आहे. पगडीची ओळख कायम राखण्यासाठी लोकांनी तिला भोगोलिक वैशिष्ट्य म्हणून मान्यता मिळण्यावी मागणी केली. ४ सप्टेंबर २००९ रोजी त्यांची मागणी पूर्ण झाली आणि पुणेरी पगडी ही बौद्धिक मालमत्ता म्हणून जाहीर झाली.

 
पुणेरी पगडीची ओळख...
पुणेरी पगडीच्या वरच्या भागाला माथा म्हणतात. उजव्या बाजूला असणारा उंच भाग म्हणजे कोका आणि त्याचे टोक म्हणजे चोच. पगडीचे देखणेपण हे या चोचीवर उवलंबून असते. चोचीला असलेला गोंडा म्हणजे जरतार. पगडीच्या कडेच्या पट्टीला घेरा म्हटले जाते. घेर्‍याखाली कपाळावर येणार्‍या भागाला कमल, तर आतील भागाला गाभा म्हटले जाते. पगडीवर केलेले जवाहिरी काम आणि जरतार यांवर त्या पगडीची किंमत ठरत असते.


पुणेरी पगडीचा इतिहास...
१९व्या शतकात महादेव गोविंद रानडे यांनी पुणेरी पगडी घालण्यास सुरुवात केली, असे म्हणतात. त्यानंतर लोकमान्य टिळक, तात्यासाहेब केळकर, दत्तो वामन पोतदार यांनीसुद्धा ही पगडी घातली. १९७३च्या घाशीराम कोतवाल ह्या नाटकानंतर पुणेरी पगडी अधिक प्रसिद्ध झाली.


पुण्याच्या कलेचे प्रतीक... 
आजच्या काळात पगडीचा वापर उत्सव सोहळ्यांमध्ये व शाळा, महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक दिन साजरा करताना केला जातो. तसेच देवीचा गोंधळ करतानाही तिचा वापर होतो. पुण्याच्या कलेचे प्रतीक म्हणून नाटकांमध्ये व चित्रपटांमध्ये पुणेरी पगडीचा वापर अनेकदा दाखवण्यात येतो.


पगडीचा लाल रंग...
सध्या तयार स्वरूपात मिळणारी पुणेरी पगडी ही पूर्वी कापड घेऊन बांधली जात होती. यासाठी माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून डोक्याच्या आकाराचा साचा बनवण्यात येत यायचा. त्या साचावर कोष्टी म्हणजे विणकर समाजातील कारागीर दर पंधरा दिवसांनी घरोघरी जाऊन पगडी बांधून द्यायचे. सुती कापडाची लाल रंगाची पट्टी, त्याला बत्ती कापड असे म्हटले म्हणत, ती कांजीत बुडवून त्याची घट्ट बांधलेली पगडी पंधरा दिवस टिकायची. या कापडामुळेच लाल रंग हा देखील पडीचा ओळख बनला.


पद्धतही बदलली, मूळ स्वरूप तसेच टिकवून....
बाजाराच्या मागणीनुसार रंग, कापड यांत आता काळानुसार फरक पडला आहे. पगडी तयार करण्याची पद्धतही बदलली आहे. मात्र त्याचे मूळ स्वरूप तसेच टिकवून आहे. पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले हे तीन पिढ्यांपासून पगडीची परंपरा जपत आले आहेत. आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साच्यावरून कागदी लगद्याचा साचा तयार केला जातो आणि त्यावर कापड, स्पंज वापरून पगडी तयार केली जाते व तिला आतून अस्तर लावले जाते. रेशीम किंवा सॅटिनच्या पगडीला अधिक मागणी असते. भगवी, जांभळी, राणी कलर, मोतिया अशा अनेक रंगात पगडी तयार केली जात असली तरीही त्याच्या मूळ लाल रंगाकडेच ग्राहकांचा ओढा आहे. गणेशोत्सवात गणेशमूर्तीला घालण्यासाठी तसेच, पांडुरंगाच्या मूर्तीसाठीही पगडी तयार केली जाते.

 

पुढील स्लाइडवर पाहा यांनी घातली पुणेरी पगडी...

बातम्या आणखी आहेत...