आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानेश्‍वर माऊलीच्या अश्वाची चिरविश्रांती, हृदय विकाराच्या झटक्‍याने मृत्यू; 8 वर्षे केली सेवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मानाचा अश्व "हिरा' रविवारी सकाळी हृदयविकाराने मृत्युमुखी पडला. अाता नवीन अश्व त्वरित दाखल होणार अाहे. कर्नाटकातील बेळगावजवळच्या अंकली येथील श्रीमंत सरदार शितोळे यांच्याकडे माउलींच्या मानाच्या अश्वाची परंपरा आहे. अंकली येथून पाच दिवसांचा प्रवास करून हे अश्व आळंदीत पोहोचले होते. 


७ जुलैला माउलींच्या पालखीच्या प्रस्थानासोबत अश्व पुणे मुक्कामी दाखल झाले. मात्र, रविवारी सकाळी हिरा नामक मानाच्या अश्वाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती पालखी सोहळ्याच्या वतीने देण्यात आली. या अश्वाचे वय १२ वर्षांचे होते. माउलींच्या पालखी सोहळ्यात या अश्वाने सलग आठ वर्षे सेवा बजावली होती. त्याच्या अचानक मृत्यूने हळहळ व्यक्त होत असली तरी माउलींची सेवा बजावताच त्याला आलेला मृत्यू भाग्याचा असल्याची भावनाही अनेकांनी व्यक्त केली. 

 

बातम्या आणखी आहेत...