आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कास्टिंग काऊच सर्वच क्षेत्रात, समाजाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोण दांभिक : ऋ्षिकेश जोशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- फक्त फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर अनेक क्षेत्रांत कास्टिंग काऊच होते. कास्टिंग काऊचमध्ये कोणावर जबरदस्ती केली जात नाही. एखाद्याला तशी आॅफ आली तर ते नाकारणे त्या व्यक्तीच्या हाती असते. कास्टिंग काऊचकडे बघण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोण हा देखील दांभिक आहे. असे मत अभिनेता ऋषिकेश जोशी यांनी व्यक्त केले. ते पुण्यात एका चित्रपटाच्या प्रमोशननंतर पत्रकारांशी बोलत होते. 

 

जोशी पुढे म्हणाले, कास्टिंग काउच तर प्रत्येक क्षेत्रात होते पण फक्त फिल्म इंडस्ट्री नावाने केली जाणारी ओरड चुकीची आहे. केवळ कुपमंडूक वृत्तीच्या लोकांनाच हा विषय महत्वाचा वाटतो. प्रत्येकाचा यशाकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगळा असतो, त्यामुळे ज्याला जे साध्य करायचं ते करतात. सगळीकडे हे होते. याचा फायदा उठवणारी लोकही आहेत आणि अन्याय झाला तर आवाज उठवणारे सुध्दा लोक आहेत.


सरोज खान आणि खासदार रेणुका चौधरी यांनी कास्टिंग काऊचबद्दल केलेल्या विधानांनतर सर्वच क्षेत्रात होणा-या कास्टिंग काऊचची चर्चा सुरु झाली होती. यानंतर अनेकांनी या विषयावर आपली मते व्यक्त केली होती. 
 

बातम्या आणखी आहेत...