आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी, दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; पुण्यातील शिवणे येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पत्नी व दोन मुलीची हत्या करून एका व्यावसायिकने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील शिवणे परिसरात काल (शुक्रवार) रात्री ही घडली. नीलेश सुरेश चौधरी असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकचे नाव आहे.

 

सूत्रांनुसार, नीलेश चौधरी याने आधी आपल्या 7 वर्षीय श्रीया व 12 वर्षीय श्रावणी या दोन मुली व पत्नी नीलमची निर्घृण हत्या करून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी ही घटना उघडकीस आली. सकाळी दरवाजा न उघडल्याने शेजारी राहाणार्‍या लोकांना संशय आला. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

 

खिशात सापडली सुसाईड नोट...

नीलेश चौधरी याच्या खिशात सुसाईड नोट सापडली आहे. कर्जबाजारीपणामुळे आपण कुटुंबाला संपवत स्वत: आत्महत्या करत असल्याचे चौधरी याने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...