आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅटसाठी पतीला मारहाण, दिरावर अश्लील आरोप, छुप्या कॅम-यात कैद झाले पत्नीचे कारनामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वाकडमध्ये एका आयटी प्रोफेशनल महिलने पतीचा फ्लॅट हडपण्यासाठी त्याला मारहाण केली तर दिर आणि सासू सास-यांवर अश्लील आरोप केल्याचा प्रकार समोर आला आहे पीडित पतीने या अत्याचाराचे व्हिडिओ रेकाॅर्डिंग केले असून कौंटूंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. 

 

नितिन आणि निकिता आयटी प्रोफेशनल दांपत्य, दोघेही एका साॅफ्टवेअर कंपनीत काम करतात. त्यांनी 2016 मध्ये प्रेमविवाह केला आहे. दोघांनाही चांगला पगार आहे. पण लग्न झाल्यापासून दोघांमध्ये वाद सुरु होते. आता पत्नीने अत्याचाराची सीमा गाठल्याने नितिन ने वकिलांमाफर्त कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. लग्न लवकर करत नसल्यामुळे निकिताने नितिनला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नितिनला तिच्याशी लग्न करावे लागले. लग्नांतर ती काही दिवसांतच त्याला  त्रास देऊ लागली. घर घ्या आणि ते माझ्या नावावर असावे, असा हट्ट तिने धरला. त्यानुसार त्यांनी वाकड येथे सुमारे 60 लाख रुपये किंमतीचा फ्लॅट घेतला. कागदोपत्री निकिता ही त्या फ्लॅटची पहिली मालकीण आहे. परंतु, फ्लॅटसाठी लागणारी टोकन रक्कम व होम लोन नितिनने काढले, अर्जात नमूद करण्यात आले आहे.      

 

दिरावर केला अश्लील आरोप, सासू सास-यांचा अपमान

नितिनचे आईवडील एक दिवस आपल्या मुलाचा संसार पहाय त्यांच्या घरी आले. मात्र, सासू-सासरे घरी आल्याची अडचण झाल्याने निकिताने त्यांना तुम्ही गावठी आहात, तुम्ही नालायक असून पुन्हा आमच्या घरात येऊ नका, अशी धमकी दिली. तसेच तिने नितिनच्या भावावर देखील अश्लील आरोप केल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. यावर नितिनचे निकिताच्या माहेरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर उलट त्याच्याच कुटुंबावर केस दाखल करण्याची धमकी दिली शिवाय निकिताने घर सोडून जाण्यास सांगितले व 2 कोटी 50 लाख रुपये देण्याची मागणी केली. पत्नीच्या कारनाम्यामुळे निराश झालेल्या नितिनने तिचे हे कारनामे मोबाईल मध्ये रेकाॅर्ड करण्याचा प्रयत्न केला पण तिने दोन मोबाईल फोन फोडले त्यांनतर त्याने घरात छुपा कॅमेरा बसवला आणि आपल्या पत्नीचे कारनामे रेकाॅर्ड केले. 

 

बातम्या आणखी आहेत...