आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरपीडित पत्नीला मुलांसह रुग्णालयात सोडून पती पसार, बारा वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पती-पत्नीचे नाते सगळ्यात मजबूत समजले जाणारे नाते असते. मात्र कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पत्नीला आणि दोन चिमुरड्यांना रुग्णालयात सोडून पती पसार झाल्याचा प्रकार पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उघडकीस आला आहे. पतीच्या या कृत्यामुळे मरणयातना सहन करत असलेल्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे.

 

रुकसाना शेख अस पीडित महिलेच नाव असून सलीम शेख अस पतीचं नाव आहे. रुकसाना आणि सलीम यांना अरमान आणि अंजुम अशीं दोन अपत्ये आहेत. सध्या रुकसाना वायसीएम रुग्णालयात मरणाच्या यातना भोगत असून अरमान, अंजूमला शिवाजीनगरच्या अनाथ आश्रमात जाण्याची वेळ आली आहै. प्रेमविवाह केलेल्या रुकसाना शेख (वैजापूर, औरंगाबाद) आणि सलीम शेख (सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश) दोघे शहरांत फिरून पोट भरण्यासाठी मदारीचा खेळ करतात. दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकून सलीम व रुकसाना मदारीच्या करमणुकीचे खेळ करीत होते. त्यावरच तब्बल दहा ते बारा वर्षे संसाराचा गाडा हाकत होती. मदारीच्या करमणुकीचे खेळ करीत ते दोघे मुलांसह पुण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून कासारवाडीत वास्तव्य करु लागले.  मात्र, त्यांच्या सुखी संसारात अचानक विरजण पडले होते. रुकसाना सतत आजारी पडू लागली. एकवेळची पोटाची भ्रांत असलेल्या सलीमकडे तिच्यावर उपचार करण्याची ऐपत नव्हती.

 

 पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मती रुग्णालय (वायसीएम) सलीमने रुकसानाला उपचारासाठी 28 एप्रिलला दाखल केले. तेव्हा तिला कॅन्सर झाल्याचे सलीमला समजताच, त्याने रुकसानासह दोन्ही मुलांना सोडून पळ काढला आहे. तो अद्याप रुग्णालयाकडे फिरकला देखील नाही. सध्या रुकसाना वायसीएमच्या आयसीयू मध्ये मरण यातना भोगत आहे. तर रिअल लाईफ रिअल पिपल संस्थेकडून रुकसानाची काळजी घेतली जात आहे.

 

रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे एम ए हुसेन यांनी रुकसाना व सलीमला असलेल्या दोन्ही अपत्यांचे पोषण करीत आहेत. येत्या काही दिवसात त्यांना पुण्याच्या महिला व बालकल्याण समितीकडे अर्ज करुन अनाथ आश्रमात ठेवण्यात येणार असल्याची माहीती हुसैन यांनी दिली आहे. रुकसानाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात असल्याचे कारणाने त्यांची काळजी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे महादेव बोत्रे, मनोज देशमुख, शंकर यादव आणि रुग्णालयाचा स्टाफ घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...