आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात Double Murder: दुसरा विवाह करण्यासाठी पतीनेच रचला पत्नी आणि मुलाच्या हत्येचा कट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मयत अश्विनी भोंडवे - Divya Marathi
मयत अश्विनी भोंडवे

पिंपरी चिंचवड- पुण्यातील हिंजवडी आय टी पार्क  हद्दीत शनिवारी रात्री झालेल्या दुहेरी खुनाने खळबळ माजली होती मात्र काही तासाच पोलिसांनी आरोपींना गजाआड केले आहे. सर्व कट नराधम पतीनेच केल्याच उघड झाला आहे. पतीचे एका महिलेशी प्रेम संबंध होते. पत्नीचा खून केल्यानंतरच तुझ्याशी लग्न करता येईल, असे त्याने तिला सांगितले होते, त्या प्रमाणे दोघांनी प्रत्येकी पन्नास-पन्नास हजाराची सुपारी देऊन, पत्नी आणि मुलाची हत्या घडवून आणली. याप्रकरणी आरोपी, प्रेयसी आणि दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.


पत्नी आणि मुलाच्या खूनप्रकरणी दत्ता वसंत भोंडवे (वय 30 रा.दारुंब्री ता.मावळ, जि.पुणे) याने हिंजवडी पोलिसात फिर्याद नोंदवली होती. .त्यानुसार दोन अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पहिला क्षणा पासून दत्ता भोंडवे याच्यावर हिंजवडी पोलिसांचा संशय होता. अश्विनी दत्ता भोंडवे, अनुज दत्ता भोंडवे अस खून झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. 

 

फिर्यादी दत्ता वसंत भोंडवे, मयत पत्नी अश्विनी, दहा महिन्याचा मुलगा अनुज हे सर्व चारचाकी गाडीने डांगे चौक येथील पत्नीच्या आईकडे गेले होते. ते परत घरी येत असताना मुंबई-बेंगलोर हायवेवर पाणी पिण्यासाठी गाडी थांबवली होती. त्यावेळी अचानक दोन इसमानी गाडीत येऊन पत्नी अश्विनीच्या तोंडाला रुमाल दाबून गाडी जांभे गावच्या पुढे घेऊन जाण्यास दत्ता भोंडवे याला सांगितले. चारचाकी गाडी नेरे रोडवर आणली असता पत्नी अश्विनी यांचा अज्ञात दोघांनी दोरीने गळा आवळून खून केला, तर पती दत्ता भोंडवे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. सोबत असलेला दहा महिन्याचा अनुज रडत होता,त्यामुळे अज्ञातांनी त्याचा देखील तोंड दाबून खून केला. हे सर्व केल्यानंतर अज्ञातांनी मोबाईल आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. असा घटनेचा बनाव रचण्यात आला. मात्र पोलिसांनी काही तासाच्या आतच आरोपी दत्ताचे बिंग फोडले. याप्रकरणी प्रेयसी,आणि अज्ञात दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...