आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्‍नीच्‍या डोक्‍यात धारदार शस्‍त्राने वार करून कोंडले घरात, पत्‍नीचा मृत्‍यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी पती. - Divya Marathi
आरोपी पती.

पिंपरी चिंचवड - चारित्र्याच्‍या संशयावरून 19 वर्षीय पत्‍नीच्‍या डोक्‍यावर पतीने धारदार शस्‍त्राने वार केल्‍याची खळबळजनक घटना खेड परिसरातील जैदवाडी येथे घडली. पत्‍नीवर जीवघेणे वार केल्‍यानंतर या क्रूर पतीने तिला तसेच घरात कोंडून ठेवले. नंतर शेजारच्‍यांना याची माहिती झाल्‍यानंतर त्‍यांनी तात्‍काळ तिला रुग्‍णालयात दाखल केले. मात्र आज (शुक्रवारी) उपचारादरम्‍यान तिचा मृत्‍यू झाला. पल्ल्वी रविंद्र जैद (वय 19) असे मृत पत्‍नीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी पती रवींद्र जैद आणि पल्लवी यांचे मागील वर्षी लग्न झाले होते. गेल्या काही दिवसांपासून रवींद्रला पल्लवीच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाला होता. त्‍यामुळे त्‍याने पत्‍नीचा शारीरीक आणि मानसिक छळ सुरू केला होता. काल (गुरुवार) रात्री दोघांमध्ये यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्यानंतर आरोपी पती रवींद्रने पल्लवीच्या डोक्यात आणि पाठीवर धारदार हत्याराने वार केले. ऐवढेच नव्‍हेतर पती रवींद्र पल्लवीला जखमी अवस्थेत घरात कोंडून निघून गेला. नंतर पल्लवीने जखमी अवस्थेत मदतीसाठी आरडाओरड केली असता स्थानिक नागरिकांनी तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र आज (शुक्रवारी) सकाळी पल्लवीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मृत पत्‍नीच्‍या आईने खेड पोलिस स्थानकात रवींद्र मारुती जैद विरोधात तक्रार दाखल केली आहे. खेड पोलिस आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...