आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवड: पती पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड-  पति पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना दुपारी 3 वाजेच्‍या सुमारास शहरात घडली आहे. पिंपरी चिंचवड मधील दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. उत्तम तुकाराम सूर्यवंशी (35), मुक्ता उत्तम सूर्यवंशी (31) अशी आत्महत्या केलेल्या पती आणि पत्नीचे नाव आहे. दोघेही राहणार भोसले वस्ती, चऱ्होली येथे राहत होते. आत्महत्येचे करण अद्याप अस्पष्ट आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील चऱ्होली परिसरात आज दुपारी पती आणि पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्‍यांचा मुलगा कृष्णा आणि मुलगी पूजा हे यावेळी शाळेत गेले होते. तर मृत मुक्ता सुर्यवंशी यांचा भाऊ देखील कामावर गेला होता. यादरम्‍यान घरात कोणीही नसताना सूर्यवंशी दाम्पत्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपविले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. अद्याप या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...