आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने अन्न सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अामची कायम साथ राहील: कॅराेला स्कउटेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - ‘भारत देश हा कृषी क्षेत्रातील महासत्ता आहे. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादन घेण्यासाठी अग्रेसर देश आहे.  भाजीपाल्याच्या उत्पादनात या देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. आमचा देश भौगोलिकदृष्ट्या लहान असल्याने जगाची अन्नाची संपूर्ण भूक भागवू शकत नाही. म्हणून उच्च दर्जाचे कृषी तंत्रज्ञान आम्ही जगाला       देण्याचा प्रयत्न करतोय. भारतासारख्या माेठ्या देशाला अन्न सुरक्षेकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते.

 

त्यासाठी अाम्ही तुमच्यासाेबत अाहाेत. भारत- नेदरलँड मैत्रीला नवा अायाम देण्यासाठीच अापण बारामतीत अालाे अाहाेत,’ असे प्रतिपादन नेदरलँडचे उपपंतप्रधान तथा कृषी व अन्न मंत्री कॅराेला स्कउटेन यांनी शुक्रवारी व्यक्त केला.   


भारत- डच सरकारच्या द्विपक्षीय संबंधातून तयार हाेणाऱ्या पशुधन अनुवंश सुधारणा व उच्च गुणवत्ता केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्या बाेलत हाेत्या. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे अादी मान्यवर उपस्थित हाेते. पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट या निमंत्रितांची मात्र अनुपस्थिती हाेती.   
या प्रकल्पांतर्गत संतुलित पशू आहार, विहार, रोगनिदान व उपाय, तसेच अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण वीर्य उत्पादनासाठी गोठा उभारण्यात येणार आहे.

 

करोला म्हणाल्या की, डच सरकारने बारामती येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचा तीन वर्षांचा कार्यक्रम आखला आहे. शेतकरी उच्च शेती तंत्रज्ञानाच्या संधीचा नक्की फायदा घेतील असा मला विश्वास आहे. नेदरलँड हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा कृषी माल निर्यातदार देश आहे. आमच्या देशातील शेतकरी व कृषी माल प्रक्रिया उद्योग उच्च गुणवत्तापूर्ण माल जगाला पुरवतात. 

 

पुढील स्लाईडवर वाचा, डच उपपंतप्रधान आकर्षक : शरद पवार  

 

बातम्या आणखी आहेत...