आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: मोशीत भरलेय भारतातील सर्वात मोठे \'किसान\' कृषी प्रदर्शन, पाहा फोटोज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारतातील सर्वात मोठे 'किसान' कृषि प्रदर्शन पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे (13 ते 17 डिसेंबर) सुरू आहे. या प्रदर्शनात भारतातील पाचशेपेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक सहभागी झाल्या आहेत. प्रदर्शनात भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने सहभाग घेतला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र मोशी येथे हे प्रदर्शन सुरू असून दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू आहे.

 

आधुनिक तंत्रज्ञान व कृषि क्षेत्रातील नवे विचार शेतक-यांपर्यंत पोहोचविणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषि निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव ऊर्जा, नर्सरी, शेती लघुउद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतक-यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणा-या 100 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे.

 

'स्पार्क' या दालनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील 10 स्टार्टअप्सना किसान प्रदर्शनात त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून यातून नवउद्योजकांना शेतीशी निगडित नवीन संकल्पना मांडण्यात आली आहे. पाच दिवसीय प्रदर्शनामध्ये देशभरातून सुमारे एक लाखापेक्षा अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज व्यक्त जात आहे.

 

प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे. प्रदर्शन स्थळी जाण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल बस स्टॉप पासून बसची मोफत सोय करण्यात आली आहे. किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी 020 30252000 किंवा www.kisan.in या संकेतस्थळावर संपर्क साधता येत आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, मोशीत भरलेल्या कृषी प्रदर्शनातील फोटोज....

बातम्या आणखी आहेत...