आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चशिक्षित महिलांना फेसबुकवरून दीड कोटीचा गंडा; आरोपी अशी करायचा फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवडमधील दोन महिलांसह देशातील अनेक उच्च शिक्षित महिलांना फेसबुकच्या माध्यमातून दीड कोटींचा गंडा घातल्याचे भोसरी पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी हेनरी अझुबुके अरिबिके या नायझेरिवन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टात हजर करण्‍यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

सूत्रांनुसार, पिंपरी-चिंचवडमधील डॉक्टर महिलेला फेसबुक मित्राने तब्बल 41 लाख 82 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा गुन्हा दाखल आला आहे. याप्रकरणी डॉ.प्रतिभा शामकुवर यांनी भोसरी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार भोसरी पोलिसांनी कसून तपास केला असता. दिल्ली येथून हेनरी अझुबुके अरिबिके (वय-38) या नायझेरिय व्यक्तीला अटक केली. याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून पिंपरी-चिंचवडमधील दोन उच्चशिक्षित महिलांसह देशातील अनेक महिलांना फेसबुकवरून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

 

यात बंगळुरु येथील महिलेला 66 लाख रुपये, कुलू मनाली येथील महिलेला 30 लाख रुपये, वसई ठाणे येथील महिलेला 8 लाख रुपये, निगडी येथील महिलेला 5 लाख रुपये तर कासारवाडी येथील डॉक्टर महिलेला 42 लाख रुपयांना फेसबुकच्या माध्यमातून गंडा घातला आहे, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या सर्व उच्च शिक्षित महिला 45 ते 50 वयोगटातील आहेत. आरोपी हेनरी अझुबुके अरिबिके हा फेसबुक वरून पीडित महिलांशी मैत्री करायचा आणि त्यांना मी परदेशात असल्याचे भासवून विश्वासात घ्यायचा आणि तुम्हाला गिफ्ट पाठवतो त्यात सोन्याचे दागिने आणि डॉलर पाठविले आहेत, अशी माहिती द्यायचा ते गिफ्ट कस्टमकडून सोडवा असे सांगायचा त्यानंतर त्याच्याच साथीदार फोन करून बँकेत लाखो रुपये भरायला लावायचा, अशी माहिती समोर आली आहे.

 

अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका...

फेसबूकवरील अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून नये. फेसबुकच्या माध्यमातून संपर्क वाढवून काही लोक आर्थिक फसवणूक करत असल्याचे कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...