आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅपीच्या नावाखाली मुलींचे कपडे काढून केली तपासणी, 2 महिला शिपायांवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्यात बारावी-दहावीच्या परीक्षा सुरू असताना परीक्षेतील काॅपीचे प्रकार टाळण्यासाठी लाेणी काळभाेर येथे बारावीच्या परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थिनींना कपडे काढण्यास भाग पाडून त्यांची तपासणी करण्यात अाल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे.

 

याप्रकरणी संतप्त पालकांनी लाेणी काळभाेर पाेलिस ठाण्यात दाेषींविराेधात कडक कारवार्इ करण्याची मागणी केली अाहे. याप्रकरणी १७ वर्षीय पीडितेने महिला शिपाई जानकी पाठक व अाशा पाटील यांच्याविराेधात पाेलिसांत फिर्याद दिली अाहे.    


पीडित मुलीची बारावीची परीक्षा सुरू आहे. २१ फेब्रुवारी राेजी इंग्रजीचा पेपर असल्याने संबंधित विद्यार्थिनी मैत्रिणींसाेबत परीक्षेसाठी  गुरुकुल विद्यालय एमअायटी काॅलेज येथे गेली. त्या वेळी विद्यालयाच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या दाेन महिला शिपायांनी तिला बाजूच्या खाेलीत नेऊन तिचे कपडे उतरवण्यास सांगितले.

 

त्यानंतर कॉपी पाहण्याच्या नावाखाली तिची तपासणी केली. त्यानंतर खाेलीबाहेर अाल्यावर तिने घडलेला प्रकार मैत्रिणींना सांगितल्यावर त्यांनी सुद्धा अामच्यासाेबत असाच प्रकार घडल्याचे सांगितले. महिला शिपाई यांनी काॅपी चेक करण्याच्या निमित्ताने त्यांचे कपडे काढल्याचा अाराेप विद्यार्थिनींनी केला अाहे.


तीनदा तपासणी केल्यानंतर मुलींनी दिली घरी माहिती
आधी तपासणी केल्यानंतरही २६ फेब्रुवारी राेजी महिला शिपायांनी पुन्हा मुलींसोबत असाच प्रकार केला. त्यानंतर २८ फेब्रुवारी राेजी वाणिज्य संघटना या विषयाचा पेपर देण्यासाठी विद्यार्थिनी महाविद्यालयात गेल्या असता पोलिसांनी पुन्हा मुलींचे कपडे काढून तपासणी केली. त्यामुळे संतापलेल्या  मुलींनी घरी अाल्यावर घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी मुलींना साेबत घेऊन पाेलिसांत तक्रार दिली. त्यानुसार महिला शिपाई जानकी पाठक व अाशा पाटील यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, या प्रकाराचा सर्वत्र निषेध व्यक्त करून कारवाईची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...