आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात व्हॉट्सअॅपच्या स्टेटसमुळे 14 वर्षीय शाळकरी मुलाची निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चाकणमध्ये काल (गुरुवार) 14 वर्षीय शाळकरी मुलाचीव्हाट्सअॅप स्टेटसवरून आणि कुत्रा असे संबोधल्यावरून निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. या घटनेत एक मुलागा जखमी झाला आहे. अनिकेत शिंदे असे हत्या झालेल्या मुलाचे तर ओंकार बिसनाळे असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी आठ आरोपी पैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत, ओंकार आणि सर्व आरोपी एकाच गटातील होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अनिकेत शिंदे आणि आरोपी यांनी मिळून काहींना मारहाण ही केली होती, तसा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र काही दिवसांपूर्वी यांच्यात फूट पडली आणि यांच्यात वैर निर्माण झाले. मग व्हॉट्सऍपवर समोरच्या पेक्षा स्वतःचे स्टेटस वरचढ असले पाहिजे. लक्ष केंद्रित केले गेले. एकाने 'द किंग' असा स्टेटस ठेवला तर दुसरा 'आपुणच बादशहा' असा स्टेटस ठेवायचा. त्यातच मयत अनिकेत शिंदेने दोन दिवसापूर्वी ओंकार झगडेला फोन केला होता त्यात, आम्हाला जाता येता कुत्रा असे का म्हणता असा जाब ओंकार झगडेला अनिकेतने विचारला असता तुम्हाला कुत्रा नाही तर काय म्हणायचे तुम्ही आता दुसऱ्या गटाचे आहात, असे म्हटला. त्यांच्यात फोनवरून शिविगाळ करत बाचाबाची केली.

 

राग मनात धरून गुरुवारी अनिकेतला ओंकारने फोन केला आणि मला तुला भेटायचे आहे असे सांगितलं तर अनिकेतने संग्राम दुर्ग भुईकोट किल्ल्यात बोलावले. त्यानुसार अनिकेत शिंदे, रामनाथ उर्फ टिल्या सुखदेव घोडके, ओंकार मनोज बिसनाळे हे किल्ल्यात आले. आरोपी ओंकार झगडे आणि किरण धनवटे हे पिस्तूल आणि कोयता घेऊन आले. अनिकेतला बाजूला घेऊन ओंकार झगडे  डोक्याच्या पाठीमागील बाजूस कोयत्याने वार केला. त्याचबरोबर फिर्यादी ओंकार बिसनाळे याच्या डोक्याला किरण धनवटे याने पिस्तूल लावला आणि स्ट्रीगर दाबला मात्र गोळी बाहेर आली नाही. तो कसा बसा पळाला आणि  अनिकेतला आवाज दिला, अनिकेत पळत असताना ठेच लागून खाली पडला. नंतर ओंकार झगडे आणि किरण धनवटे यांनी अनिकेतवर कोयत्याने सपासप वार केले. ओंकारने मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला. अनिकेतचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक मनोज यादव हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...