आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME:पुण्यात 20-25 गाड्या फोडल्या; एकाला रंगेहात पकडून नागरिकांनी दिला चोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणेसह पिंपरी चिंचवडमध्ये गाड्या फोडण्याचे सत्र सुरूच आहे. थेरगावमध्ये वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड करत तीन अज्ञातांनी कोयते घेऊन दहशत पसरण्याचा प्रयत्न केला. तीन अज्ञातांपैकी एकाला पकडून नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. नंतर त्याला वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

महेश मुरलीधर तारू (वय-43, रा.नखाते नगर,थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादनुसार वाकड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 12 च्या सुमारास  (एम.एच-14 ए.एफ-4601) दुचाकीवरून तीन अज्ञात हातात कोयते घेऊन आले. त्यांनी अचानक रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड सुरू केली. महेश तारू हे अडवण्यासाठी गेले त्यावेळी दुचाकीवरील एकाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या खिशातून पैसे काढून दमदाटी केली. तसेच पुढे जाऊन धनगरबाबा मंदिर, नखाते नगर, नम्रता हाऊसिंग सोसायटी येथील गाड्यांची तोडफोड केली. यात तीन चाकी, चारचाकी आणि दुचाकीचा या गाड्यांचा समावेश आहे. एकूण 20 ते 25 वाहनांची तोडफोड केली आहे. गाड्यांचे नुकसान आणि दहशत यामुळे पिंपरी चिंचवडकर हैराण झाले आहेत. त्यात पोलिस या घटना रोखण्यात अपयशी ठरत आहेत. अशातच संतप्त नागरिकांनी एका समाजकंटकांचा पाठलाग केला. एकाला पकडून चांगलाच चोप दिला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.फुटेजच्या मदतीने पोलिस इतर दोघांचा शोध घेत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...