आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या मित्राकडून बलात्काराचा प्रयत्न, अब्रु वाचवण्यासाठी महिलेची बेडरुमच्या बाल्कनीतून उडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- रहाटणी येथे मध्यरात्री घरात घुसून महिलेवर अतिप्रसंग करण्‍याचा प्रयत्न झाला होता. नराधमाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन, 30 वर्षीय पीडितेने बेडरुमच्या बाल्कनीतून उडी मारली होती. या प्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे.

 

पतीच्या मित्रानेच चाकूचा धाक दाखवत महिलेवर अतिप्रसंग करण्‍याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. किशोर शेलार असे आरोपीची नाव असून पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आहे.

 

तुम्ही सुंदर दिसता, मला तुमच्याशी शरीरसंबंध ठेवायचे आहेत...
ही घटना गुरुवारी (ता.5) मध्यरात्री घडली होती. पीडितेचा पती हा आरोपी किशोर शेलार याच्यासोबत दारु प्यायला बसला होता. रात्री दोन वाजेच्या सुमारास किशोर पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला. त्याने पीडितेचे तोंड दाबून तिला चाकूचा धाक दाखवला. 'तुम्ही सुंदर दिसता, मला तुमच्याशी शरीरसंबंध ठेवायचे आहेत. तसे न केल्यास दोन्ही मुलांना जीवे मारुन टाकेन, अशी धमकी दिली. तो अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नात होता तितक्यात अब्रु वाचवण्यासाठी पीडितेने बेडरुमच्या बाल्कनीतून उडी मारली होती. पीडिता एका चारचाकी वाहनावर पडल्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला असून डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.

 

वाकड पोलिसांनी किशोरला सीसीटीव्हीच्या आधारे शोधून बेड्या ठोकल्या आहेत. किशोर विरोधात  याआधी हत्या, हल्ला करणे आणि अमली पदार्थ बाळगल्याचे तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... नराधमाचे छायाचित्र...

बातम्या आणखी आहेत...