आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 कोटींच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या काँग्रेस नगरसेवकासह 5 जणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या नगरसेवकासह 5 अटकेत, गुजरातमधून चालते हे रॅकेट?

 

पुणे- चलनातून बाद केलेल्या एक हजार व ५०० रुपयांच्या नाेटा बदलून त्या बदल्यात नव्या नाेटा देण्याचे रॅकेट अजूनही सक्रिय असल्याचे पुण्यात शुक्रवारी उघडकीस अाले. तीन काेटी रुपयांच्या अशा हजार- पाचशेच्या जुन्या नाेटा घेऊन पुण्यात बदलण्यासाठी अालेल्या संगमनेरचा काँग्रेस नगरसेवक गजेंद्र बजाबा अभंग याच्यासह पाच जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. विजय अभिमन्यू शिंदे (रा. खडकी, पुणे), अादित्य विश्वास चव्हाण (रा. मुळशी), सुरेश जगताप नवनाथ काशिनाथ भंडागळे (रा. पुणे) अशी इतर अाराेपींची नावे अाहेत. 


गुरुवारी रात्री रविवार पेठेतील बंदिवान मारुती मंदिराजवळ काही लाेक चलनातून बाद झालेल्या नाेटा बदलून घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पाेलिस शिपाई सागर केकाण यांना मिळाली हाेती. त्याअाधारे सहायक पाेलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या पथकाने रविवार पेठेत सापळा रचला. त्यांनी संशयितरीत्या फिरणाऱ्या गजेंद्र अभंगसह पाच जणांना हटकले, त्यांच्याकडील तीन बॅगची झडती घेतली असता त्यात दाेन काेटी ९० लाख रुपये किमतीच्या (१ हजाराच्या २९ हजार अाणि पाचशे रुपयांच्या ३६ नाेटा) चलनातून बाद झालेल्या नाेटा सापडल्या. 


असे चालते रॅकेट : जुने एक काेटी द्या, नवे १२ ते १८ लाख घ्या 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या रकमेत अभंग याचे १ काेटी रुपये अाहेत, तर उर्वरित चाैघांचे सुमारे प्रत्येकी ५० लाख रुपये अाहेत. या व्यक्ती एकमेकांच्या अाेळखीच्या नाहीत, मात्र नाेटा बदलून देणाऱ्या व्यक्तीशी त्या केवळ फाेनवरून संपर्कात हाेत्या. ही रक्कम काेणाकडून बदलून मिळणार हाेती, याबाबत पाेलिसांनी चाैकशी केली, मात्र या पाचही जणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पाेलिस कारवार्इच्या वेळी पैसे स्वीकारणारे दाेन जण पसार झाले. जुन्या एक काेटी रुपयांच्या बदल्यात नवीन नाेटांत १२ लाख रुपये दिले जाणार हाेते, अशी माहिती प्राथमिक तपासात समाेर अाली अाहे. नगरसेवक अभंग याने लाेणी (जि. नगर) येथील दाेन तरुणांना १२ लाख रुपये नवे चलन देऊन त्यांच्याकडून ही एक काेटीची रक्कम अाणल्याचे सांगितले जाते. ताे १७ ते १८ लाख रुपयांच्या बदल्यात ही रक्कम पुण्यात देणार हाेता, अशी माहितीही पाेलिसांना मिळाली अाहे. 


रॅकेट गुजरातमधून असल्याचा संशय 
भिवंडी पाेलिसांनी ३० जून राेजी कळवा येथील पारसिक सर्कलजवळ अमित गार्डन येथे जुन्या नाेटा बदलण्यासाठी अालेल्या तीन संशयितांना ताब्यात घेतले हाेते. त्यांच्याकडून १ हजार व ५०० रुपयांच्या एक काेटी ६८ लाख रुपयांच्या जुन्या नाेटा जप्त केल्या हाेत्या. राजन मृत्युस्वामी तेवर (वय ४४, रा. ठाणे), इम्रान अहमद शेख (३५, रा. ठाणे) व शेखर कैलास जाधव (२६, रा. सायन पूर्व, मुंबई) या अाराेपींना अटक झाली हाेती. त्यापाठाेपाठ अाता २० दिवसांत पुण्यात दुसरी कारवाई करण्यात अाली. याचाच अर्थ अजूनही मुंबई- पुणेे परिसरात जुन्या नाेटा बदलून देणारे माेठे रॅकेट सक्रिय अाहे, गुजरात सीमेवरील काही लाेकही यात सहभागी असल्याचा पाेलिसांना दाट संशय असून पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत. 


परवानगी घेऊन तपास 
बाद नाेटांचा बेकायदा वापर केल्यामुळे पाेलिसांनी या पाचही जणांविराेधात 'द स्पेसिफाइड बँक नाेट्स अॅक्ट २०१७' चे कलम ४, ५, ६, ७ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला अाहे. प्राथमिक चाैकशी करून व समज देऊन या पाच जणांना साेडण्यात अाले. त्यांची सखाेल चाैकशी करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली जाणार असल्याचे सहायक पाेलिस निरीक्षक वैभव पवार यांनी सांगितले. 


काेण अाहेत अाराेपी 
अभंग संगमनेरमधील काँग्रेसचा तिसऱ्यांदा निवडून आलेला नगरसेवक अाहे. माजी उपनगराध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती म्हणूनही त्याने काम केले. जमीन खरेदी-विक्री व्यवसायासह व्हील अलाइनमेंट सेंटरचा मालक असून पुण्यात प्लायवूड व्यवसाय सुरू करण्याचा त्याचा विचार होता. विजय शिंदे, सुरेश जगताप, नवनाथ भंडागळे हे व्यवसाय करणारे असून अादित्य चव्हाण हा विद्यार्थी अाहे. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...