आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात माणुसकीला काळिमा; पिंपरीतील तळवडे येथे 80 वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्‍ट्राची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पिंपरीतील तळवडे येथील रूपीनगर झोपडपट्टीत 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

सूत्रांनुसार, ही घटना 13 जानेवारीला मध्यरात्री घडली. पीडिता झोपडीत एकटी झोपली होती. अज्ञात नराभमाने झोपडीचा पत्रा उचकटून प्रवेश केला आणि त्याने बळजबरीने बलात्कार केला. मुलगा घरी आल्यानंतर पीडितेने त्याला आपबिती सांगितली. मुलाने तातडीने पीडितेला घेऊन देहूरोड पोलिस स्टेटनला अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली.

 

अतिप्रसंग झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न
पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली. महिलेवर अतिप्रसंग झाल्याचे त्यात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बोरकर करीत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...