आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ACCIDENT: पुण्यात संगम ब्रिजचे रेलिंग तोडून मुठा नदीत कोसळला ट्रक, 2 जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 21 टन कच्चे लोखंड घेऊन जात असलेल्या ट्रक चालकास शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याचे सुमारास डुलकी लागल्याने, कामगार पुतळया जवळील जुन्या संगम पुलावरुन एक ट्रक 50 फुट खाली नदीपात्रात कोसळून भीषण अपघात झाला. या घटनेत ट्रक मधील ट्रकचालक व क्लीनर यांचा मृत्यु झाला आहे.

 

चंद्रकांत शिव अण्णा (वय-31, रा.गुलबर्गा, कर्नाटक) असे मयत ट्रकचालकाचे तर स्वामी (पूर्ण नाव नाही, रा.गुलबर्गा, कर्नाटक) असे क्लीनरचे नाव आहे. सुमारे दहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

 

वाघोली येथील बाळासाहेब देशमुख यांच्या मालकीच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायातील सदर ट्रक एमएच 42 टी 7312 हा अलिबाग परिसरातील आळंद येथून 21 टन वजनाचे कच्चे लोखंड घेऊन हैद्राबाद येथे शनिवारी रात्री जात होता. पहाटे चार वाजण्याचे सुमारास ट्रकचालक चंद्रकांत शिवअण्णा हा सदर ट्रक संगम पुलावरुन घेऊन जात असताना, त्यास डुलकी लागली त्यामुळे संबंधित दहा चाकी ट्रक पुलाच्या दगडी कठडयाला घासत जाऊन, वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अचानक ट्रक नदीपात्रात पडला.

 

सदर ट्रक नदीपात्रात उलटा पडल्याने ट्रक मधील सर्व सामान नदीपात्रात पडले, तर ट्रक चालक आणि क्लीनर यांना ट्रकमधून बाहेर पडता न आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यु झाला. सदर दोन्ही मृतदेह ट्रकमध्ये अडकून पडले तसेच ट्रक मध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढणे जिकिरीचे झाले. अग्निशामक दलास सदर घटनेची माहिती मिळताच, अग्निशामक दलाच्या दोन गाडया तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अवजड ट्रक नदीपात्रात खोलवर पलटी पडल्याने त्यांना ही तातडीने कोणतेच आप्तकालीन काम करता येर्इनासे झाले. अखेर, पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ट्रकच्या केबिनचा एक दरवाजा उघडून चालक चंद्रकात शिवअण्णा याचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, क्लीनर स्वामी याचा मृतदेह अडकल्याने बाहेर काढता येणे अशक्य झाले. अखेर, पोलिसांनी घटनास्थळावर 50 टन वजनाची मोठी क्रेन बोलवून घेत ट्रक उचलून नदीपात्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सदर ट्रक हा संगम पुला शेजारील रेल्वे पुलाला न धडकता खाली पडल्याने मोठा अर्नथ टळला. रात्रीच्या वेळी संगम पुलावरुन दोन्ही बाजूने वाहतूक सुरु असते. त्यामुळे ट्रकचालकास अंदाज न आल्याने अपघात घडल्याची सुरुवातीला शक्यता वर्तवण्यात येत होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो आणि व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...