आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • पुणे: महिलेवरील गोळीबार प्रकरणी अॅड.सुशील मंचरकर यांना अटक Advocate Sushil Machanrkar Arrested By Pune Police

पुणे: महिलेवरील गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवडच्या हिंदुस्थान अँटिबायोटिक वसाहतीत 9 जूनला एका महिलेवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केला होता. शीतल सिकंदर (वय-35, रा.गांधीनगर, पिंपरी) असे या महिलेचे नाव असून ती थोडक्यात बचावली आहे.त्या महिलेचे नाव होते. या खूनी हल्ला प्रकरणी अॅड. सुशील मंचरकर यांना शुक्रवारी सायंकाळी गवळीमाथा येथून पोलिसांनी अटक केली.

 

काय आहे हे प्रकरण?

पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक वसाहतीत 90 जून रोजी शीतल सिकंदर यांच्यावर गोळीबार झाला होता. त्या महिलेने 2014 मध्ये अॅड. मंचरकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हाही नोंदवला होता.

 

कोण आहेत सुशील मंचरकर?

- सुशील मंचरकर हे राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती आहेत.

- कामगार नेते कैलास कदम यांच्या हत्येचा कट रचणे, तुरूंगातून आरोपी पळवून लावणे, असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

- महिलेवर गोळीबार केल्याप्रकरणी सुशील मंचरकर यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...