आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबबऽऽ 3484 कोटींचा गैरव्यवहार..समृद्ध जीवनच्या महेश मोतेवार विरोधात अाराेपपत्र दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज काे-अाॅपरेटिव्ह साेसायटी लि.च्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवनचे मालक महेश माेतेवार व प्रसाद पारसवार यांच्याविराेधात सीबीअायने अाेडिशात भुवनेश्वरच्या विशेष सीबीअाय न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. समृद्ध जीवनच्या माध्यमातून ३ हजार ४८४ काेटी रुपयांची फसवणूक केल्याचे सीबीअायने स्पष्ट केले अाहे.

 

पुणे येथील समृद्ध जीवन, महेश माेतेवार, प्रसाद पारसवारविरुद्ध मलकानगिरी पाेलिसात २०१३ मध्ये गुन्हा दाखल केला हाेता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या अादेशानुसार जून २०१४ राेजी तपास सीबीअायकडे देण्यात अाला. मलकानगिरीत खासगी मल्टिपर्पज काे-अाॅपरेटिव्ह प्रा.लि.ची शाखा हाेती. या माध्यमातून म्हशी-शेळी व्यवसायासाठी कर्ज तसेच गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून एजंटच्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे गाेळा केले. ३५ लाख लाेकांकडून कंपनीने ३,६७८ काेटी रुपये जमा केल्याचे निष्पन्न झाले अाहे. त्याची प्रस्तावित मॅच्युरिटी किंमत ४,३२० काेटी रुपये हाेत हाेती. त्यापैकी ८३६ काेटी रुपये परत केल्याने एकूण ३,४८४ कोटींची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

 

बातम्या आणखी आहेत...