आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DSK यांची मेहुणी अनुराधा पुरंदरेंना पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक; गुंतवणुकदारांचा फसवणुकीचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना आर्थिक गुन्हे शाखेची काला (रविवार) अटक केली. अनुराधा पुरंदरेंवर गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

 

अनुराधा पुरंदरे या डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या बिझनेस पार्टनर आहेत. पुरंदरेंना आज दुपारी कोर्टात हजर करणार असल्याचे सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे यांनी     ही माहिती दिली आहे.

 

डीएसकेंविरोधात 36 हजार 875 पानांचे आरोपपत्र
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके सध्या येरवडा कारागृहात आहे. डीएसके यांनी 2 हजार 43 कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने 36 हजार 875 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात डीएसकेंनी 2 हजार 43 कोटींचा घोटाळा केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

डीएसकेंची 276 बँक खाती गोठवली..
डीएसके व त्यांच्या पत्नीला अटक केल्यानंतर पथकाने डीएसकेंच्या घर, कार्यालयांवर छापे टाकून कागदपत्रे जप्त केली होती. या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी डीएसकेंची 276 बँक खाती गोठवली. तसेच त्यांच्या 300 मालमत्ता गोठविल्या आहेत.

 

दरम्यान, ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर गेल्या ऑक्टोबरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर मुंबई, कोल्हापूरसह तीन शहरांत डीएसकेंवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...