आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राबरोबर मैत्रिणीचा संपर्क जुळवून देते म्हणून चिडलेल्या तरुणाकडून तरूणीवर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मित्राबरोबर मैत्रिणीचे संपर्क जुळवून देते असे सांगणार्‍या तरुणीवर एका तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटनास समोर आली आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

 

उरुळी कांचन (ता.हवेली) येथे घडली. अमोल विलास चौधरी (रा.खेडेकर मळा,उरुळी कांचन) असे आरोपीची नाव आहे. आरोपी सध्या फरार आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 

सूत्रांनुसार, उरूळी कांचन, खेडेकर मळावस्तीवरील हॉटेल अशोकापाठिमागे आरोपी अमोल चौधरी याने तरुणीला अडवले. तुझ्या मैत्रिणीचा संपर्क का जुळवून देते म्हणून चिडून त्याने धारदार शस्त्राने तरुणीच्या पोटात, हातावर वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तरूणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

 

या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले तपास करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...