आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टात हजर राहात नव्हता पती; कोर्टाने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंगवर दिला घटस्फोटाचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बारामती कोर्टाने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून एका दाम्पत्याची काडीमोड केली आहे. जर्मनीत नोकरी करणारा पती आणि भारतात राहाणार्‍या पत्नीच्या घटस्फोटाचा निर्णय कोर्टाने व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून दिल्याची घटना इतिहासात पहिल्यांदा घडली आहे. मागील दोन वर्षांपासून पत्नी-पत्नी विभक्त राहात होते.

 

काय आहे हे प्रकरण...?
- बारामतीतील दीवानी न्यायाधीश महेंद्र बडे यांच्या कोर्टाने हा निर्णय दिला आहे. बारामती राहाणारे सुरेश आणि राधिका (बदललेली नावे) या दाम्पत्यात मागील काही महिन्यांपासून वाद सुरु होता.
- नोकरीनिमित्त सुरेशला कायम जर्मनीला जावे लागत होते आणि हेच राधिकाला खटकत होते. यावरून दोघांमध्ये कायम वाद व्हायचे. दोघांनीही माघार न घेतल्याने पती-पत्नीमधील नाते तुटण्याची वेळ आली.
- दोघांनी विभक्त होण्‍याचा निर्णय घेऊन घटस्फोटासाठी बारामती कोर्टात 27 जून 2017 रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. नंतर पती नोकरीसाठी पुन्हा जर्मनीत निघून गेला. मागील काही महिन्यांपासून तो जर्मनीत आहे.
- सुरेश सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने कोर्टाच्या निर्णयाला विलंब होत होता. अखेर अॅड. प्रसाद खारतुडे यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारा सुरेशला बाजू मांडण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली. कोर्टने मंजुरी दिली.
- व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून सुरेशने कोर्टाने आपली बाजू मांडली.

 

आपापसात वाद मिटवर्‍यासाठी दिली 6 महिन्यांची मूदत
- दरम्यान, कोर्टाने सुरेश आणि राधिकाला आपापसात कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी 6 महिन्यांची मूदत दिली. परंतु तरीही दोघे घटस्फोटावर अडून होते.
- अखेर व्हिडिओ कॉलिंगद्वारा कोर्टाने सुरेश आणि राधिकाला विभक्त झाल्याचा निर्णय दिला.


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...