आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP नगरसेवक पिस्तूल घेऊन वारीत घुसला, दर्शनावरुन पोलिसांसोबत घातली हुज्जत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- उद्योग नगरी अर्थात पिंपरी चिंचवडंहून पुण्यनगरीकडे जगद्‍गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होत असताना दापोडीमध्ये भाजप नगरसेवकाने पिस्तूल घेऊन वारीत प्रवेश केला. त्याने तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावरून पोलिस आणि त्याच्यात‍ चांगलीच बाचाबाची झाली. शनिवारी दुपारी ही घटना घडली.


जगद्‍गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाजपचा एक पिस्तुलधारी नगरसेवक चक्क वारीत घुसल्याचे खळबळ उडाली. भाजपचा हा प्रताप पाहून वारकरी काही काळ भयभीत झाले होते. पोलिसांनी नगरसेवकाला तातडीने बाजुला घेत त्याच्याकडील पिस्तूल ताब्यात घेतले. दरम्यान, नगरसेवकांनी पोलिसांसोबत चांगली हुज्जत घातली होती.

 

आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्याने सर्वत्र चैत‍न्यमय वातावरण आहे. विलोभनिय सोहळा पाहाण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. तुकोबांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचवेळी नियम धाब्यावर बसवून शहरातील भाजपचा नगरसेवक पिस्तूल घेऊन वारीत घुसला. पादुकांचे दर्शन घेत असताना नगरसेवकाने आपल्या जवळील पिस्तुल सहकार्‍याच्या स्वाधीन केले. नगरसेवकाचा हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच नगरसेवकसह त्याच्या बॉडीगार्डला बाजुला घेत त्याच्याकडून प‍िस्तूल ताब्यात घेतले. त्यावरून भाजप नगरसेवकाने पोलिसांशी हुज्जत घातली. परंतु त्याने परवाना दाखवल्यानंतर पिस्तूल परत त्याच्या ताब्यात देण्यात आले.

 

सध्या मंत्री, खासदार, आमदारांसह नगरसेवकांमध्ये स्वरक्षणासाठी पिस्तूल बाळगण्याचे फॅड राज्यात दिसत आहे. मात्र, पिस्तूल घेऊन पालखी दर्शनाला येणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पांडुरंगा अशा बंदुकधारी लोकप्रतिनिधींना सद्बुद्धी देवो, हीच अपेक्षा वक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...