आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलले कमळ...संगीता खोत सांगलीतील पहिल्या भाजपच्या महापौर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि पूर्व मंत्री पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला असलेली सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेवर भाजपने आपले कमळ फुलविले आहे. महापौरपदी भाजपच्या संगीत खोत यांची निवड झाली आहे. हात उंचावून झालेल्या मतदानात संगीता खोत यांना 42 मते तर काँग्रेस आणि आघाडीच्या उमेदवाराला 35 मते मिळाली. संगीता खोत यांचा 7 मतांनी विजय झाला.  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून वर्षा अमर निंबाळकर याना 35 मते मिळाली.

 

उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. सूर्यवंशी यांना 42 तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून स्वाती पारधी 35 मते मिळाली.

 

दरम्यान, सांगली महापालिकेच्या 78 जागांपैकी 36 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला 23 जागा मिळाल्या. दोन अपक्ष उमेदवार निवडून आले मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेला सांगलीत खाते उघडता आले नाही.

 

बातम्या आणखी आहेत...