Home | Maharashtra | Pune | BJP Mayor Of Pimpari Chinchwad Touches The Feet Or MNS Raj Thackeray

पुण्यात भाजपच्या महापौरांनी धरले राज ठाकरेंचे पाय.. सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 13, 2018, 05:07 PM IST

भाजपचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी सगळ्यांच्या समोर राज ठाकरे यांचा चरणस्पर्श केला

 • BJP Mayor Of Pimpari Chinchwad Touches The Feet Or MNS Raj Thackeray

  पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी पिंपरीचा दौरा केला. या दरम्यान, भाजपचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी सगळ्यांच्या समोर राज ठाकरे यांचा चरणस्पर्श केला. नंतर राहुल जाधव आणि राज ठाकरे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राहुल जाधव हे राज ठाकरे यांचे पाय धरल्याचे ‍फोटोत दिसत आहे. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे.

  आधी होते मनसेचे सर्कीय कार्यकर्ता...

  राहुल जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी ते यापूर्वी मनसेचे सर्कीय कार्यकर्ता होते. राहुल यांनी आपल्या राजकीय करियरची सुरुवात राज ठाकरे यांच्या आर्शीवादानेच केली होती. राज ठाकरे यांनी राहुल यांनी 2012 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली होती. निवडणूक जिंकल्यानंतर राहुल जाधव यांनी अपक्ष महेश लांडगे यांना पाठिंबा दिला होता. नंतर त्यांनी लांडगे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

  राजकीय वर्तुळात तर्कविर्तक सुरु...
  2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राहुल जाधव यांनी दुसर्‍यांदा विजय संपादन केला. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा ऐनवेळी पत्ता कट करण्‍यात आला. नंतर भाजपचे दूसरे महापौर म्हणून राहुल जाधव यांनी निवड करण्यात आली. राहुल जाधव आज महापौर झाले आहेत मात्र राज ठाकरे यांच्या प्रति त्यांची निष्ठा आजही कायम आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना पाहाताच राहुल जाधव यांनी त्यांचा चरणस्पर्ध करून आशीर्वाद घेतला. मात्र, राजकीय वर्तुळात तर्कविर्तक सुरु झाले आहे.

Trending