आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुटीत मामाच्या गावाला निघालेला मुलाचा इंद्रायणी एक्सप्रेसमधून पडून मृत्यु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सोलापूर येथील मामाच्या घरी जाण्यासाठी निघालेला मुंबर्इ येथील एका 13 वर्षीय मुलाचा चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यु झाला. ही घटना आज (बुधवार) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. अर्जुन कृष्णा रमेशराव (वय-13,रा. डोंबवली वेस्ट, मुंबर्इ) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

 

अर्जुन रमेशराव हा मुंबर्इतील डोंबवली येथील रहिवासी असून परीक्षेनंतर शाळेला सुट्टी लागल्याने बुधवारी सकाळी इंद्रायणी एक्सप्रेसने मामासोबत जात होता. चिंचवड रेल्वे स्थानका जवळ तो दरवाजाजवळ बाहेर पाहण्याकरिता आले असता, अचानक त्याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने जागीच त्याचा मृत्यु झाला. लोहमार्ग पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहे. त्याचप्रमाणे पिंपरी रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी रेल्वेरुळ ओेलांडत असताना रेल्वेची धडक बसून एका 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला आहे. अद्याप मृताची ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम पोलिस करीत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...