आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगाबाजी प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी प्रियकराने तिच्या घराबाहेर घडवून आणला स्फोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रेमा तुझाला रंग कसा..अशीच एक घटना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडली आहे. दगाबाज प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी प्रियकराने तिच्या घराबाहेर स्फोट घडवून आणला. ही घटना पुण्यातील धायरी परिसरातील अलोक पार्क सोसायटीत बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.

 

मिळालेली माहिती अशी की, धायरी परिसर बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका मोठ्या स्फोटाने हादरला होता. भीषण आवाजाने एका घराच्या खिडकीची काचही फुटली होती. स्फोटप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी किशोर आत्माराम मोडक (20) आणि अक्षय राजाभाऊ सोमवंशी (24) या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी किशोर मोडक याने मित्राच्या मदतीने स्फोट घडविल्याचे चौकशीत समोर आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...