आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सर्वांना माझा शेवटचा नमस्कार...\'; फेसबुकवर पोस्‍ट करून तरुण व्‍यापार्‍याची आत्‍महत्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 'सर्वांना माझा शेवटचा नमस्कार...' अशी फेसबुकवर पोस्ट लिहून एका तरुण सराफा व्यापार्‍याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राहुल राजाराम फाळके (वय 32, रा. वनवासमाची ता.कराड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

नोटाबंदी व जीएसटीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या राहूल याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट म्हटले आहे. राहुल याचा मृतदेह तालुक्यातील शिरवडे रेल्वे स्टेशनजवळ सापडला. त्याने मालगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजते.

 

कराडमधील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर गणपती मंदिराजवळ राहुल याचे मंगलमूर्ती ज्वेलर्सचे दुकान आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे तो आर्थिक अडचणीत आला होता. त्याला व्यवसायही बंद करावा लागल्याने अनेकांची देणी भागविणे त्याला अशक्य झाले. यातूनच तो नैराश्येच्या गर्तेत अडकला होता. या नैराश्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...राहुल फाळके याने फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट जशीच्या तशी...

बातम्या आणखी आहेत...