आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात, 30 जणांविरोधात गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा वाढदिवस साजरा करणे पुण्यातील काही तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. गवळीच्या वाढदिवसानिमित्त 17 जुलै रोजी शहरातील बोपोडी आणि खडकी परिसरात अवैध फ्लेक्स लावण्यात आले होते. पोलिसांनी अवैध फ्लेक्स लावणार्‍यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

30 जणांविरोधात गुन्हा...

- अरुण गवळीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावण्यात आले होते. याप्रकरणी गणेश बाबूराव सोनवणे (41) आणि सुरेश बाबूराव ससाणे (45) याच्यासह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, फ्लेक्स लावण्यापूर्वी आरोपींनी कोणतही परवानगी घेतली नाही. आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी समज देऊन त्यांची सूटका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...