आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत घरांची जाहिरात देऊन फसवणूक; संतप्त नागरिकांनी केली प्रदर्शनात तूफान तोडफोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिचंवडमध्ये मोफत घरांची जाहिरात देऊन एका खासगी गृहकर्ज कंपनीने भरवलेल्या प्रदर्शनात संतप्त नागरिकांनी तुफान तोडफोड केली. प्रदर्शनाला आज (शनिवार) सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली. त्यानंतर केवळ गृहकर्जाविषयी माहिती मिळत असल्याचे कळताच सकाळपासून रांगेत उभे असलेल्या संतप्त नागरिकांनी स्टॉलची तूफान तोडफोड केली.

 

सकाळपासून रांगेत उभे ठेऊन नागरिकांना भ्रमनिरास केल्याने त्यांचा सहनशिलतेचा बांध फुटल्याने ही तोडफोड झाल्याचे बोलले जात आहे.

 

सूत्रांनुसार, ऑटोक्लस्टरमधील टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या स्टॉलवर तोडफोड झाली आहे. टाटा फायनान्स कंपनीने कर्जसाठी स्टॉल उभा केले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे दिली जातील, असे सांगितले. तसेच या योजनेअंतर्गत मिळणार्‍या घरासाठी कर्ज उपलब्ध करुन देतो असे सांगण्यात आले. मात्र, यावेळी आमची फसवणूक होत असल्याचा आरोप करत संतप्त जमावाने तूफान तोडफोड करण्‍यास सुरुवात केली.

 

नागरिकांना मोफत घरे देण्यात येतील, अशा प्रकारच्या जाहिराती प्रदर्शनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. परंतु स्टॉलवर केवळ कर्जाविषयी आणि बांधकाम व्यावसायिकांची माहिती मिळत असल्याने भ्रमनिरास झाला आणि आलेल्या 500 ते 600 नागरिकांनी प्रदर्शनाची तोडफोड केली. नागरिकांनी हातात येईल ते साहित्याची तोडफोड केली. गृहकर्जाची माहिती देणारी पोस्टर्स फाडले. पिंपरी महापालिकेच्या ऑटोक्लस्टरमध्ये हे प्रदर्शन भरले होते. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून गोंधळ घालणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच संबंधीत कंपनीची चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी माहिती दिली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...प्रदर्शनात संतप्त नागरिकांनी केलेल्या तूफान तोडफोडचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...