आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले-धनजंय मुंडे; मुंबईत बहीण-भावाची गळाभेट, पुण्यात टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- एक दिवस आधी मुंबईतल्या एका जाहीर कार्यक्रमात बहीण पंकजा मुंडे यांची गळाभेट घेतलेल्या धनजंय मुंडे यांनी पुण्यात मात्र त्यांच्यावर हल्ला चढवला.

 

'आमच्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले', असा घणाघाती आरोप धनंजय यांनी केला. भाजपच्या सोळा मंत्र्यांनी 90 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. चिक्कीपासून उंदरांपर्यंत घोटाळे केले. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही, असे ते म्हणाले.

 

अजित पवारांची जीभ घसरली...
बेताल वक्तव्यांमुळे वारंवार अडचणीत येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांची जीभ बुधवारी पुन्हा एकदा घसरली. तर त्यांच्याच पक्षाचे नेते व विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाणीवपूर्वक जीभ ‘घसरू’ दिली. पुणे जिल्ह्यात बुधवारी झालेल्या दोन हल्लाबोल सभांमध्ये बोलताना तोल गेलेले पवार आणि तोल गेल्याचे ‘भासवणारे’ मुंडे लोकांना ऐकायला मिळाले.


पिंपरीतील सभेत बोलताना अजित पवार यांनी श्रोत्यांना उद्देशून प्रश्न केला, की ‘आमच्या काळात पावणेचारशे रुपयाला गॅस सिलिंडर होता. आता केवढ्याला मिळतो? 820  झालाय का 850 रुपयांना ?’  पवारांच्या या प्रश्नावर श्रोत्यांमधून दोन-तीन वेगवेगळे आकडे आले. ते ऐकून पवार म्हणाले, “हा साडेआठशे म्हणतोय म्हटल्यावर बायकोने आजच त्याला पाठवले आहे वाटते सिलिंडर आणायला. 820 रुपये असेल की 840 रुपये असेल. चल तुझं खरं. तुझी लाल.” पवारांच्या या टिप्पणीमुळे संबंधित युवकाने मान खाली घातली तर व्यासपीठावर बसलेल्या ‘राष्ट्रवादी’ नेत्यांमध्ये हशा पिकला.

 

पुढील स्लाइडवर वाचा... मुख्यमंत्री देवेंद्र ‘फसवणीस’ साहेब... असा केला उल्लेख... तुमचे वय काय तुम्ही बोलता काय?

 

बातम्या आणखी आहेत...