आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मॉर्निंग वॉकला लेखिकेवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ला, मंगला गोडबोले जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रभात रस्त्या जवळील कमला नेहरु उद्यानाजवळ तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले या मॉर्निंग वॉकला आल्या असता, त्यांचा चावा घेत त्यांना जखमी केले. यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

 

गोडबोले या नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. कमला नेहरु उद्यानाजवळ त्या आल्या असता, तीन- चार भटक्या कुत्र्यांनी अचानक त्यांच्या हाता-पायाला चावा घेत त्यांना जखमी केले. एका नागरिकाने सदर घटना पाहिल्यानंतर त्यांना कुत्र्यांचे तावडीतून सोडत, जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, सुरुवातीला रुग्णालयात त्यांना रेबीज लस उपलब्ध झाली नाही अखेर चार तासानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे त्यांना रुग्णालयाचे 40 हजार रुपयांचे बील नाहक भरावे लागले. रुग्णालयातून त्यांना घरी सोडल्यानंतर स्थानिक नगरसेविकेला त्यांनी फोन करुन, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, रेबीजीची लस उपलब्ध करुन द्यावीत अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...