आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.दाभोलकरांचे मारेकरी पाच वर्षात मोकाटच, ही शरमेची बाब; ‘जवाब दो’ आंदोलन तीव्र करणार- हमीद दाभोलकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे हत्येस पाच वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही, महाराष्ट्र पोलिस, सीआयडीचे पथक यांना अद्याप या घटनेचे मारेकरी अथवा सुत्रधार मिळून आलेली नाही ही लाजिरवाणी तसेच शरमेची बाब आहे.

 

पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरणाचा तपास वेगाने करण्यात येत असून त्यासंर्दभात दोषींवर कारवार्इ करण्यात येते. मात्र, तशाप्रकारचा सखोल तपास यंत्रणांकडून डॉ.दाभोलकर, कॉ.पानसरे, साहित्यिक कलबुर्गी यांच्या हत्येचा केला जात नसल्याची खंत डॉ. दाभोलकर यांचे पुत्र आणि अंनिसचे सरचिटणीस डॉ.हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

 

डॉ.दाभोलकर यांच्या हत्येस 59 महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप मारेकरी न भेटल्याने अंनिसच्या वतीने महर्षी वि.रा.शिंदे पुलावर निषेध आंदोलन करण्यात आहे. त्यावेळी ते बोलत होते. डॉ.हमीद म्हणाले, विवेकवादी विचारांना सध्या धोका वाढत असून देशात हिंसेचे वातावरण आहे का असे वाटते. स्वामी अग्नीवेश यांच्यावर काही धर्मांध लोकांनी हल्ला केला या गोष्टीचा अंनिसच्या वतीने निषेध व्यक्त करत आ हे. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता न येणाऱ्या लोकांकडून अशाप्रकारचे भ्याड हल्ले होतात, लोकशाहीत शासनाने त्यावर वेळीच अंकुश ठेवणे गरेजेचे आहे. डॉ.दाभलकर यांचे मारेकरी मिळेपर्यंत अनिसच्या वतीने दर महिन्याला अशाप्रकारचे आंदोलन यापुढील काळात ही सुरुच राहिल. 20 जुलै ते 20 ऑगस्ट यादरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन तीव्र करण्यात येणार असून शासनाला याबाबत जाब विचारला जार्इल.

 

डॉ. दाभोलकरांची पुस्तके हिंदी, इंग्रजीत
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलन, जात पंचायत अशा वेगवेगळया विषया संर्दभात लिखाण केलेली दहा पुस्तकांचे हिंदी व इंग्रजी भाषेत रुपांतर करण्यात येत आहे. 20 ऑगस्ट रोजी हिंदी भाषेतील दहा पुस्तके आणि ‘तिमारातून तेजाकडे’ या पुस्तकाचे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशन करण्यात येणार आहे. याबाबत लेखक आणि अंनिस कार्यकर्ते सुनीलकुमार लवटे यांनी पुस्तके अनुवादासाठी पुढाकार घेतला आहे. 20 ऑगस्ट रोजी डॉ.दाभोलकर यांचे हत्येस पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्याने सदर दिवशी महर्षी वि.रा.शिंदे पुल ते राष्ट्र सेवा दल स्मारक, पर्वती यादरम्यान पायी रॅली काढण्यात येणार आहे. त्याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, अभिनेता प्रकाश राज, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे हे सहभागी होणार आहेत. तसेच पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांचे कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित राहतील. 19 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अंनिस कार्यकर्ते अरुण जाधव यांनी डॉ.दाभोलकर यांचे हत्येनंतर पाच वर्षाच्या कालावधीतील विविध वृत्तपत्रातील बातम्यांची कात्रणे जमा केली असून त्याचे 19 व 20 ऑगस्ट रोजी प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...