आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसकेंच्या आलिशान कार जप्त ; आर्थिक गुन्हे शाखेने केली कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारून त्याची परतफेड न केल्याप्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या सहा आलिशान गाड्या पोलिसांनी सोमवारी जप्त केल्या असून त्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांची एकूण किंमत ५ कोटी ८३ लाख रुपये आहे.आलिशान गाड्यांत एक पोर्श, दोन बीएमडब्ल्यू, दोन टोयाटो कॅमरी या गाड्यांचा समावेश आहे. यासोबतच एक एमव्ही आगस्टा या महागड्या दुचाकींचाही समावेश आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी दिली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... डीएसकेंच्या जप्त करण्यात आलेल्या आलिशान गाड्या...

 

बातम्या आणखी आहेत...