आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DSK कडून कर्जाच्या रकमेचा वापर घरखर्च व मौजमजेसाठी; पोलिस तपासात निष्पन्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम माेठ्या प्रमाणात जाहिरातबाजी, मार्केटिंग, हाॅटेलिंग, हाेम डेकाेरेशन, मनाेरंजन, टीव्ही दुरुस्ती, शूज-कपडे खरेदी,स्पा, किराणा, दूधवाला, घरखर्च यावर खर्च केल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले अाहे. कंपनीचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे यांनी 'निधी विनियाेग दाखला' अहवाल दिलेला असून त्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अाहे. सीएच्या अहवालावर बँकांनी डीएसकेंना पुढील हप्ते वितरित केलेले असून बँकांनी दिलेले सुमारे ७११ काेटी रुपये मूळ उद्दिष्टासाठी न वापरता ते दुसरीकडे वापरूनही त्याकडे डाेळेझाक करण्यात अाली अाहे. 


डीएसके कंपनी सन २०१४ पासून अार्थिक ताेट्यात जाऊ लागली हाेती. मात्र, कंपनी नफ्यात असल्याचे कागदाेपत्री दाखवण्यात अाल्याचे तपासात निष्पन्न झाले अाहे. याप्रकरणी डीएसके कंपनीचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे यांचे हितसंबंध गुंतल्याने त्यांनी याेग्य वेळीच कंपनी ताेट्यात असल्याचे दाखवून न दिल्याने वेगवेगळ्या बँकांनी डीएसकेडील कंपनीस कर्जे मंजूर केली, तर ठेवीदारांनी माेठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. त्यामुळे सनदी लेखापाल यांच्या मदतीशिवाय डीएसकेंना गैरव्यवहार करता येणे शक्य नव्हते, असा युक्तिवाद करत सीए घाटपांडे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात यावा, अशी मागणी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विशेष न्यायाधीश अार.एन.सरदेसार्इ यांच्या न्यायालयात साेमवारी केली. बचाव पक्षाचे वकील एस.के.जैन यांनी प्रतिवाद करत सरकारी वकिलांचे मुद्दे खाेडून काढत घाटपांडे यांना जामीन मिळावा, अशी मागणी केली. न्यायालयात याप्रकरणी उर्वरित युक्तिवाद मंगळवारी हाेणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...