आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी सांगलीच्या तरुणाला पुण्यात अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सांगली ते स्वारगेट यादरम्यान प्रवास करीत असलेल्या सांगलीच्या एका तरुणाकडे 500 रुपये किंमतीच्या 46 बनावट नोटा मिळून आल्या आहेत. याप्रकरणी अविनाश संभाजी चव्हाण (वय-30, रा.डोंगरसोनी, ता.तासगाव, सांगली) या तरुणास अटक करण्यात आले आहे.

 

सहकारनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मोरे यांनी फिर्याद दिली आहे. अविनाश चव्हाण व त्याचा मित्र प्रविण शिंदे यांनी आपसात संगमत करुन मिरज ते राजगुरुनगर एस.टी मध्ये बसुन सांगली ते स्वारगेट असा एसटीने प्रवास करीत असताना, त्याचे जवळ भारतील चलनातील 500 रुपये दराच्या एकूण 46 बनावट नोटा मिळून आल्या आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक बी.आर.बडे पुढील तपास करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...