आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळमध्ये पत्नीशी अनैतिक संबंधातून पुण्यात मित्राची हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कात्रज-देहू राेड बायपास हायवेलगत २ एप्रिल राेजी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्धवट कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. हाताच्या बोटांच्या नखावरून मृताचा शोध घेतला असून त्याचे नाव अर्जुन डबलबहादूर भूल (२३, नेपाळ) असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून त्याच्या मित्रानेच त्याची हत्या केली. 


या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन भाेसूर चाैधरी (१९) व रामकिसन भुरहा डगवरा थारू (२३) या नेपाळमधील दोन अाराेपींना अटक केली अाहे.  अर्जुनला दारूचे व्यसन होते. त्यावरून पोलिसांनी त्याच्या मित्रांचा शोध घेतला. त्यात अर्जुन चाैधरी व रामकिसन थारू यांची नावे समोर आली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. १ मे राेजी महाराष्ट्रदिनी सुटी असल्याने तिघेही मद्यपानासाठी आंबेगावात एका गॅरेजजवळील ठिकाणी बसले. नेपाळमध्ये राहत असताना रामकिसनच्या पत्नीशी अर्जुनचे अनैतिक संबंध असल्याचा संशय रामकिसनला होता. त्यामुळे दोघांत वादही झाला होता. रामकिशनने हा राग मनात धरून ठेवला होता. महाराष्ट्रदिनी  लाकडी बांबू व दगडाने मारून त्याची हत्या केली. शिवाय, मृतदेह कचऱ्यात टाकून त्यावर कचऱ्याने झाकून टाकले हाेते.    

 

बातम्या आणखी आहेत...