आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर मैत्रिणीचा विनयभंग; बीडच्या तरुणावर गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-  फेसबुकवर मैत्री झालेल्या एका तरुणीचे लग्न झाल्यानंतर तिची फेसबुकवर अाणि व्हाॅॅट्सअॅपवर बदनामी करणाऱ्या बीडच्या तरुणावर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणीने किरण ताैर (रा. बीड) याच्याविराेधात तक्रार दाखल केली अाहे.  


संबंधित तरुणी व किरण ताैर यांची तीन वर्षांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली हाेती. फेसबुक चॅटिंग, व्हाॅट्सअॅप मेसेज व फाेनच्या माध्यमातून त्यांच्यातील संवाद वाढत गेला. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.  या तरुणीला वेळाेवेळी भेटण्यासाठी किरण बीडवरून पुण्यात येत असे. मात्र काही दिवसांनी त्यांच्यात मतभेद हाेऊन दुरावा निर्माण झाला. फेब्रुवारी महिन्यात सदर तरुणीचे लग्न हाेऊन ती सासरी गेली. मात्र, किरणने तरुणीचा पती व सासरच्या मंडळींना फाेनकरून तिच्याविषयी बदनामीकारक सांगत हाेता. तसेच अात्महत्या करण्याची धमकीही देत हाेता. सदर तरुणीने किरणला अापल्या अायुष्यात दखल देऊ नकाे, असे अनेकदा समजावून सांगितले. तरीही किरण तिला साेशल मीडियावरून धमकी देत हाेता, शिवीगाळ करत हाेता. अखेर या जाचाला कंटाळून तरुणीने किरणविराेधात पाेलिसात तक्रार दिली.

 

बातम्या आणखी आहेत...