आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा जण साताऱ्यातून अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा -  दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या एका टोळीचा साताऱ्यामध्ये पर्दाफाश करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ५६.४२ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. यामधील २६.५४ लाखांच्या बनावट नोटांची छपाई झालेली होती. तर, २९.८८ लाख रुपये किमतीच्या नोटा एका बाजूने छापण्यात आल्या होत्या. 
साताऱ्यातील काटेश्वर मंदिर परिसरामध्ये अनिकेत प्रमोद यादव आणि अमोल अर्जुन शिंदे हे दोघेजण बनावट चलनी नोटा व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना अटक केली.

 

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी यामागे एक टोळीच कार्यरत असल्याचा खुलासा केला. साताऱ्याच्या शुक्रवार पेठ भागात ही टोळी बनावट नोटांची छपाई करत होती. त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली आणि तिथून सहा जणांना अटक केली. गणेश भोंडवे, अमोल शिंदे, अनिकेत यादव, अमेय बेलकर, राहुल पवार आणि अन्य एकाचा या आरोपींत समावेश आहे. दरम्यान, गणेश भोंडवे हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...