आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत बापाने चिरला सात महिन्यांच्या मुलीचा गळा, मृतदेह फेकला विहिरीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत बापाने सात महिन्यांच्या चिमुरडीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यात आंधळगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खून केल्यानंतर मुलीचा मृतदेह विहिरीत फेकला. एवढेच नाही तर कुकर्म करणाऱ्या बापाने मुलीचे अपहरण झाल्याच बनाव केला होता.

 

भूरा शंकर धूलकर असे नराधम बापाचे नाव आहे. अवघ्या पाच तासांत शिरूरच्या पोलिसांना तपास लावण्यात यश मिळाले. शिरूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील कुरळी-आंधळगाव हद्दीत अनिल बोरकर यांच्या शेतात भूरा धुलकर हा ऊसतोड करीत होता. त्याने 28 मार्चला रात्रीपासून परिसरात त्याची सात महिण्यांच्या मुलीला कोणीतरी उचलून घेऊन गेल्याचा बनाव केला होता. याप्रकरणी माडवगण पोलिस स्थानकात मुलगी हरवल्याची फिर्याद देण्यासाठी वडील व त्याची पत्नी गेली होती. त्याचवेळी पोलिसांना परिसरातील एका विहिरीत सात महिण्यांच्या मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे महिती मिळाली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर मुलीचा गळा चिरून तिचा निर्घृण खून केल्याचे आढळून अाले. पोलिसांनि तपासाचे चक्रे फिरवली. असता मुलीची हत्या तिच्या बापानेच केल्याचे उघड झाले. भूरा शंकर धूलकर  याने गुन्हा कबूल केला आहे.

 

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर बायको अरुणा ही बरेच दिवस माहेरी होती पुन्हा नांदायला आली त्यानंतर तिने कौशलयाला जन्म दिला. परंतु ही मुलगी आपली नाही, या संशयाने भूराच्या मनात घर केले होते. यावरून पत्नीसोबत तो कायम भांडण करत होता. बुधवारी दुपारी पती-पत्नीकडे कडाक्याचे भांडण झाले होते. रागाच्या भरात भुराने मुलीला झोपडीतून बाहेर नेले व तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. अरुणा हिने त्याला विरोध केला.ॉ परंतु तुलाही मारून टाकेल,  असा तिला दम दिला आणि मुलीचा मृतदेह जवळच्या विहिरीत फेकून दिला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...