आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लपंडाव खेळ जीवावर बेतला; पुण्यात 5 वर्षीय चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये लपंडाव खेळणे एका पाच वर्षांच्या मुलाला चांगलेच महागात पडले. अथर्व पाटील (वय-5, रा.नवले वस्ती,चिखली) असे या मुलाचे नाव आहे. खेळता-खेळता अथर्व पाण्याच्या टाकीत पडला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना निगडी परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली आहे.

 

सूत्रांनुसार, घरातून सायकलवरून बाहेर खेळायला गेला. त्याची आई घराबाहेर बसलेली होती. उशीर झाला तरी अथर्व घरी न आल्याने त्याचा शोध परिसरात सुरू झाला. पण तो सापडत नसल्याने अखेर निगडी पोलिसांना याची माहिती सायंकाळी सात वाजता देण्यात आली. पोलिस देखील तातडीने दाखल झाले आणि अथर्वचा पुन्हा शोध सुरू झाला. बराच वेळ झाला तरी अथर्व काही सापडत नव्हता. अखेर घरापासून काही अंतरावर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत रात्री दहा वाजता त्याची चप्पल दिसली, यावरून पोलिसांना संशय आला. पाण्याच्या टाकीत उतरल्यानंतर अथर्व सापडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.