आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षाविहारासाठी कुंडमळा पाहाण्यासाठी गेलेली तरुणी इंद्रायणी नदीत बुडाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वर्षाविहारासाठी गेलेली तरुणी इंद्रायणी नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शालिनी चंद्राबालन (वय 17, रा. आकुर्डी) या तरुणीचे नाव असून ती देहूरोड शेलारवाडीजवळ असलेल्या इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघायला गेलेली तरुणीचा पाय घसरून नदी पात्रात पडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तरुणी वाहून गेली. ही घटना रविवारी  दुपारी घडली. शालिनीचा शोध एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने अद्यापपर्यंत सुरू आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शालिनी तिच्या बहीण आणि भावासोबत वर्षाविहारासाठी मावळ परिसरात आली होती. इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघण्यासाठी शालिनी गेली असता तिचा पाय घसरून पाण्यात पडली. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने शालिनी वाहून गेली. शालिनी ला वाचविण्यासाठी तिच्या बहीण भावाने प्रयत्न करणे मात्र तिला वाचवू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी शोध सुरू केला. मात्र शालिनी मिळून न आल्याने एनडीआरएफच्या जवानांना बोलवण्यात आले. संध्याकाळी उशीर झक्याने बाचावकार्य रोखण्यात आले. आज सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू केले असून अद्याप शालिनीचा शोध सुरू आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...